आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- लता मंगेशकरांच्या अस्थींचे आज विसर्जन
लता मंगेशकरांच्या अस्थींचे आज नाशिकच्या रामकुंड येथे विसर्जन करण्यात येणार आहे. सकाळी साडे आठ वाजता अस्थी विसर्जन कार्यक्रम सुरू होणार आहे. यावेळी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर व इतर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
- आज उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान
आज उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. 11 जिल्ह्यात 58 मतदारसंघात हे मतदान होत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पुण्यात आज काँग्रेसचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला, असे खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांच्या या खोट्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पुणे महानागरपालिकेसमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपीला आज शिक्षा -
हिंगणघाट जळीतकांड प्रकारणात निकाल येण्याची शक्यता आहे. याप्रकरणातील आरोपी विकेश नगराळेवर पीडित प्राध्यापिकेच्या हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
- 10 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज कौटुंबिक सुख मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- VIDEO : 10 February Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी
कालच्या महत्वाच्या बातम्या
मुंबई - कोरोनाचा ( Corona ) प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्बंध पूर्णत: शिथील करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) म्हणाले. नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार विचार करत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शक्यता वर्तवली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला विशेष मुलाखत ( PM Modi Interview ) दिली आहे. या विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या बाजूने लाट असून पाचही राज्यांच्या निवडणुका जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मोदींनी भाजपा, काँग्रेस आणि इतर अनेक ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केले. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत यूपी, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधानांची ही मुलाखत यूपीमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारापूर्वी आली आहे.
मुंबई - सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई - सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. एक नोटीस जारी करून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून घेतली जाणार आहे. याचे डेटशीट ( CBSE Term 2 Exam Datesheet ) अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर लवकरच प्रसिद्ध केली जाईल.