ETV Bharat / bharat

Delhi MCD Election 2022 : दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदान सुरू, 1 कोटी 45 ​​लाख मतदार उमेदवारांचे ठरवणार भवितव्य - मतदार 1349 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार

दिल्ली महानगर पालिकेच्या (Municipal Corporation of Delhi) निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. त्याची तयारी पूर्ण तयारी करण्यात आली असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच स्वतंत्रपणे संवेदनशील बुथवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 3, 2022, 9:21 PM IST

Updated : Dec 4, 2022, 8:51 AM IST

नवी दिल्ली : दिल्ली महानगर पालिकेच्या ( Municipal Corporation of Delhi) निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 250 जागांवर होणाऱ्या निवडणुकीत सुमारे 1 कोटी 45 ​​लाख मतदार 1349 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

प्रत्येक चौथा बूथ संवेदनशील - निवडणुक प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनशील बुथवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. यावेळी एकूण 13,638 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून त्यापैकी 3356 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. म्हणजेच प्रत्येक चौथा बूथ संवेदनशील आहे.

निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष - गुजरात आणि हिमाचलसोबतच दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण गेल्या 15 वर्षांपासून येथे भाजपची सत्ता आहे. सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्ष प्रत्येक क्षेत्रात चुरशीची लढत देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, दिल्लीनंतर महापालिकेच्या सत्तेवर माझाच अधिकार आहे. काँग्रेससोबतच अनेक स्थानिक पक्षही आपापल्या भागात जोमाने निवडणूक लढवत आहेत.

अशी असेल सुरक्षा व्यवस्था - दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी दिल्ली पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बाहेरूनही काही जवानांना पाचारण करण्यात आले आहे. निवडणूक आयोग सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

  • निमलष्करी दलाच्या (CAPF) 170 तुकड्या नियुक्त करण्यात आले आहे.
  • उत्तर प्रदेशातून 11000 होमगार्ड आणि राजस्थानमधून 3000 होमगार्ड मागवण्यात आले आहेत.
  • मतदानाच्या दिवशी दिल्लीचे 4000 होमगार्ड ड्युटीवर असतील.
  • दिल्ली पोलिसांचे 45 हजार कर्मचारी आणि अधिकारी विशेष ड्युटीवर असतील.
  • दिल्ली महानगर पालिकेतील काम करणाऱ्या ५ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.

दिल्ली दंगलीनंतर अधिक दक्षता - 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, प्रथमच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीत यावेळी संवेदनशील बूथ चिन्हांकित केले आहेत. हे लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत दिल्लीतील 13,138 मतदान केंद्रांवर पॅरा मिलिटरी फोर्सच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी निमलष्करी दलाची संख्या 170 तुकड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 78 जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, गेल्या 24 तासांत उर्वरित 92 तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्वांशिवाय यावेळी संवेदनशील भागात ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 4, 2022, 8:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.