महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / snippets

'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमा विरोधात याचिका, करणकडून बदनामीचा आरोप

Karan Johar
करण जोहर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 10:35 PM IST

मुंबईKaran Johar:प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेता करण जोहर याच्यावर आधारित 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' हा सिनेमा तयार होतोय. या सिनेमा विरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिनेमाच्या नावात आणि कथेत आपल्या नावाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करणने केला आहे. 14 जूनला सिनेमा रीलिज होत असल्यानं गुरुवारी तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलं.

नावाचा गैरवापर केल्याचा दावा :करण जोहर या ब्रँडचं आणि त्याच्यासोबत असलेल्या पुण्याईचा गैरवापर होत असल्याचा दावा करणने केला आहे. सिनेमाचे पोस्टर्स, ट्रेलर्स ब्रँड करण जोहरचं नुकसान आणि बदनामी करत असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details