महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"बारामतीत दहशतीचे आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर.."-युगेंद्र पवार यांचा प्रतिस्पर्ध्यांना इशारा - Baramati Lok Sabha election

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 8:35 AM IST

बारामती Yugendra Pawar : बारामतीत महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी खासदार सुळेंच्या प्रचारासाठी गावभेट दौरे सुरू केले आहेत. उंडवडी येथे मंगळवारी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. युगेंद्र पवार म्हणाले, "बारामतीत दहशतीचं आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण होत असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो." पुढं बोलताना युगेंद्र म्हणाले, वेगळ्या प्रकारे कोणी दबाव आणायचा अथवा दहशतीचा प्रयत्न करत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. असं काही घडल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो."  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सख्ख्या पुतण्यानंचं म्हणजेच युगेंद्र पवार यांनी दंड थोपटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details