महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

गावातील पाण्याच्या टाकीवरुन तरुणानं मारली उडी; गंभीर जखमी - टाकीवरुन तरुणानं मारली उडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 8:17 AM IST

पुणे Youth jumps off water tank : पुणे जिल्ह्यातील आंबेठाण (ता.खेड) गावातील मराठी शाळेजवळील पाण्याच्या टाकीवर मनोरुग्ण तरुण विनोद गुळवे (वय-24) यानं चढून थेट उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस आणि रेस्क्यू टीमनं तब्बल 4 तास अथक प्रयत्न करुनही तरुणाला खाली उतरविण्यात त्यांना यश आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार विनोद गुळवे हा तरुण सलग दोन दिवस याच पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पहिल्या दिवशी रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी शिताफीनं खाली उतरवलं होतं. पण 26 जानेवारी रोजी हा तरुण सकाळी 11 वाजल्यापासून टाकीवर चढून उडी मारण्याची भीती दाखवत होता. त्याला वाचवण्यासाठी त्याचं कुटुंब, पोलीस प्रशासन, रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थ विनवण्या करत होते. पण तो कोणत्याही विनवणीला दाद द्यायला तयार नव्हता. शेवटी पोलीस आणि रेस्क्यू टीमनं पाण्याच्या टाकीला जाळी लावून त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण त्यानं थेट टाकीवरुन खाली उडी घेतली. घटनेनंतर जखमी तरुणास तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details