ये पवन नहीं आँधी है : नरेंद्र मोदींनी केलं जनसेना प्रमुख पवन कल्याणचं कौतुक - Pawan Kalyan - PAWAN KALYAN
Published : Jun 7, 2024, 6:00 PM IST
नवी दिल्ली - एनडीए (NDA) आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक शुक्रवारी दुपारी संयुक्त सदन (जुनी संसद) येथे पार पडली. जनसेनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि तेलुगू चित्रपट उद्योगातील सुपरस्टार पवन कल्याण यांनी बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाबद्दल प्रशंसा केली. यावेळी भाषण करताना पवन कल्याण म्हणाले की, "मोदीजी तुम्ही खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देत आहात. जोपर्यंत तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात, तोपर्यंत आपला देश कधीही कुणापुढे झुकणार नाही."
यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण यांचं भरपूर कौतुक केलं. "इथं जे पवन दिसत आहेत ना ते पवन नाहीत तर ते एक आंधी ( वादळ ) आहे", असं म्हणताच उपस्थित खासदारांसह दिग्गज व्हिआयपीमध्ये हशा पिकला. यावेळी मोदींनी केलेल्या कौतुकामुळे पवन कल्याणही सुखावल्याचं चित्र पाहायला मिळालं.