महाराष्ट्र

maharashtra

शपथ घेऊन आल्यानंतर 'भूमिपुत्रा'चा नागरी सत्कार; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या सत्काराला जमले सर्वपक्षीय नेते - Prataprao Jadhav Felicitated

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 5:07 PM IST

प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार (ETV Bharat Reporter)

बुलढाणा Prataprao Jadhav Felicitated : केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज (30 जून) पहिल्यांदाच बुलढाण्यात आले. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिशरण चौकात पुष्पवृष्टी करत जाधव यांचं जंगी स्वागत केलं. यानंतर ते त्रिशरण चौकातील आई जगदंबा मातेच्या मंदिरात आरती करुन मातेच्या चरणी नतमस्तक झाले. यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव यांना पुष्पहार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.

जाधव यांना 51 तोफांची सलामी : यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढत मंत्री प्रतापराव जाधव यांचं स्वागत केलं. तर कारंजा चौकातील भारत मातेच्या प्रतिमेला प्रतापराव जाधव यांनी अभिवादन केलं. यावेळी प्रतापराव जाधव यांचं स्वागत म्हणून 51 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच बुलढाणा येथील एका लॉन्सवर नागरी सत्कार करण्यात आला आहे. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शेकडो बुलढाणा शहरातील नागरिक या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details