लोकसभा निवडणुकीतील विजयावर उदयनराजे असमाधानी; म्हणाले, 'अशी चिटुरकी पोचपावती...' - Satara Lok sabha Election Result 2024 - SATARA LOK SABHA ELECTION RESULT 2024
Published : Jun 5, 2024, 9:51 PM IST
सातारा Satara Lok sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली. त्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे हे ३२,७७१ मतांनी विजयी झाले. मात्र, या मताधिक्क्यावर उदयनराजे समाधानी नाहीत. विजयी प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले की, "मी माझ्या आयुष्यात लोकांसाठी एवढा वेळ दिला. मग मी काय कमावलं, असा विचार मनात येतो. निवडणूक जिंकली हे ठीक आहे, पण लोक काय पाहून मतं देतात, हेच कळत नाही". जर पैसेच पाहिजे असतील तर पैसेच कमवू. शिव्या द्यायच्या असतील शिव्या देऊ आणि भ्रष्टाचार करायचा असेल तर भ्रष्टाचार करू. नीटनेटकं वागून अशी चिटुरकी पोचपावती मिळत असेल तर ठीक आहे, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलंय.