रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली! टायपिंग करत साकारलं हुबेहूब चित्र, पाहा व्हिडिओ - TRIBUTE TO RATAN TATA
Published : Oct 12, 2024, 7:36 PM IST
ठाणे : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळं संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. याचदरम्यान अनेक दिग्गजांची चित्र रेखटणाऱ्या उदय तळवलकर यांनी रतन टाटा यांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी रतन टाटा यांचं चित्र टायपिंग करत तयार केलंय. हे हुबेहूब दिसणारं चित्र रतन टाटा यांच्या निकटवर्तीयांना देण्यात येणार. उदय तळवलकर टायपिंग करत तयार केलेली चित्र अनेक दिग्गजांना चित्र भेट दिली आहेत. त्यांनी टायपिंग करत लता मंगेशकर यांचं सर्वात मोठं चित्र तयार केलं आहे. या चित्राची साईज 21 फूट बाय 13 फूट आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि दलाई लामा अशा अनेक दिग्गजांची चित्र तळवलकर यांनी साकारली आहेत. तळवलकर यांनी अवघ्या 5 तासात रतन टाटांचं चित्र साकारलं आहे. आवड असली की सवड मिळते याच उक्तीचा प्रत्यय तळवळकर यांनी आल्याचं सांगितलं. त्यांनी अनेक निसर्ग चित्र देखील साकारली आहेत. जगभरात अनेक टाईप रायटर कलाकार आहेत. मात्र, ते अवघ्या बोटांवर मोजण्या इतपत आहेत. त्यात उदय तळवलकर यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं.