महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भारतीय सैन्य दलाचं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, वैमानिकासह महिला अधिकाऱ्याला वाचवण्यात यश - सैन्य दलाचं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 1:44 PM IST

पाटणा Army Helicopter Falls In Gaya : भारतीय सैन्य दलाचं हेलिकॉप्टर शेतात कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारमधील गया इथं घडली आहे. हे विमान शेतात कोसळल्यानं त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या हेलिकॉप्टरमधील वैमानिक आणि महिला सैन्य अधिकाऱ्याला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. भारतीय सैन्य दलाचं हे शिकाऊ हेलिकॉप्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच ऑफिसर ट्रेनिंग अकादमीच्या (ओटीए) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पथकानं जखमी वैमानिकांना सोबत नेत उपचारासाठी दाखल केलं आहे. बिहारमधील कंचनपूर गावात भारतीय सैन्य दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं. प्रशिक्षण सुरू असताना पंख्यात तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे हेलिकॉप्टर तब्बल 400 फूट उंचीवर असल्याची माहितीही यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   

ABOUT THE AUTHOR

...view details