महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', शिवनेरी किल्ल्यावर रेस्क्यू टीमने वाचवला पर्यटकाचा जीव; पाहा व्हिडिओ - शिवनेरी किल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 4:23 PM IST

पुणे Shivneri Fort : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. अशातच गुरुवारी (15 फेब्रुवारी) शिवनेरी किल्ल्यावर एका पर्यटकाचा तोल गेल्यानं तो पायऱ्यांवरून पडला आणि जखमी झाला. याची माहिती मिळताच जुन्नर रेस्क्यू टीमच्या मदतीनं त्या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे. सुरेंद्र पांडुरंग लोंढे (वय-48, रा. खारघर, मुंबई) असं जखमी झालेल्या पर्यटकाचं नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिवनेरी किल्ल्यावर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेंद्र लोंढे हे गड चढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या घटनेत ते जखमी झाले. त्यानंतर या घटनेसंदर्भात जुन्नर वन विभागाच्या वतीनं जुन्नर रेस्क्यू टीमला तात्काळ कळविण्यात आलं. त्यानंतर लगेच जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य मगदूम सय्यद, लखन डाडर, आतीफ सय्यद, अली सय्यद, यांनी या पर्यटकाला गडावरुन खाली आणण्यास मदत केली आणि पुढील उपचारासाठी जुन्नरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ABOUT THE AUTHOR

...view details