माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत बँक खातं उघडून मिळणार - CM Majhi Ladki Bahan Yojana - CM MAJHI LADKI BAHAN YOJANA
Published : Jul 10, 2024, 10:53 PM IST
ठाणे Majhi Ladki Bahan Yojana : राज्यातील पात्र महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेद्वारे दरमहा 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या योजनेचे निकषही राज्य सरकारनं जाहीर केले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांचं बँकेत बचत खातं असणं आवश्यक आहे. त्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना मोफत बॅंक खाते उघडून मिळणार आहे. या योजनेत महिलांचं बँकेच्या सर्व शाखांमध्ये झिरो बॅलेन्स खातं उघडून दिलं जाईल. तसंच शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजनेचा लाभ या बँकेकडून मिळत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खातं महत्त्वाचं आहे. कारण याच बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहे. म्हणूनच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं योजनेचा फायदा घेण्यासाठी निशुल्क बँक खाते उघडायला सुरुवात केलेली आहे. या खात्यात रक्कम शिल्लक ठेवण्याची अट शिथिल केली आहे.
हे वाचलंत का :
- चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana
- लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा : महिलांना कुठंही जाण्याची गरज नाही; सरकार राबवणार ‘सातारा पॅटर्न’ - शंभूराज देसाई - Chief Minister Ladki Bahin Yojana
- 1 हजार 500 रुपयांत काय होणार? 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी महायुतीला सुनावलं - Majhi Ladki Bahin Yojana