महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तेंडुलकर परिवार कोल्हापुरात; नृसिंहवाडीत घेतलं दत्त दर्शन - TENDULKAR FAMILY IN KOLHAPUR

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2025, 8:32 PM IST

कोल्हापूर : आज (दि.१९) सकाळी तेंडुलकर कुटुंबीय कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. श्री क्षेत्र नृसिंहवाडीत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबीयांनी दत्त दर्शन घेतलं. यावेळी पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर तसंच अर्जुन तेंडुलकर हे श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. तेंडुलकर परिवार आज (दि.१९) सकाळी विमानानं साडे दहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी कोल्हापुरात विविध ठिकाणी भेटी घेऊन नृसिंहवाडी इथ आले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी दत्त महाराजांची प्रतिमा देऊन तेंडुलकर कुटुंबाला प्रसाद दिला. नवल खोंबारे यांनी मंदिराची माहिती दिली. त्यानंतर टेंबे स्वामी मठात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर कोल्हापूरकडं मार्गस्थ झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details