डॉ. सुजय विखे लढवणार विधानसभा निवडणूक... मतदारसंघ कोणता? - Sujay Vikhe Patil - SUJAY VIKHE PATIL
Published : Aug 2, 2024, 1:30 PM IST
शिंर्डी Sujay Vikhe Patil: मला आता वेळ आहे, शेजारी कुठं संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्यानं संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय आहे असं वक्तव्य डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं. विखे यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या दौ-यांबाबत माहिती दिली. या मतदार संघातून ना.राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून, आमच्या कुटूंबाच्या दृष्टीनं सुध्दा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डी मधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचं राजकाराण खुप क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत.