महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळा, मेहेर बंद होणार असल्यानं महिलांचे आंदोलन - Special Marriage Act

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 6:17 PM IST

ठाणे  Special Marriage Act : मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजेच शरीयत कायद्यानुसार होणारे विवाह रद्द करून ते विशेष विवाह कायद्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी आसाममधून सुरू झाली आहे. याविरोधात आज सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली. आतापर्यंत देशभरात शरियत कायद्यानुसार मुस्लिम विवाह केले जात होते. लग्न टिकलं नाही तर, घटस्फोटही घेता येत होता. तसंच घटस्फोटित महिलेला 'मेहर' म्हणजेच नुकसान भरपाई दिली जात होती. मात्र, विशेष विवाह कायद्यातून मुस्लिम महिलांवरील अन्याय वाढणार असल्याचा मर्जिया पठाण यांनी आरोप केलाय. बालविवाहाची वयोमर्यादा देशात आतापर्यंत तीन वेळा वाढवण्यात आली. तसंच, बालविवाह रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. असे असताना विशेष विवाह कायदा राबवून शरीयतवर गदा आणण्याची गरजच काय? या नवीन कायद्यानं मुस्लिम महिलांना मिळणारा 'मेहर' बंद होणार आहे, असा आरोप मर्जिया पठाण यांनी केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details