रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म, सामाजिक एकतेचं उदाहरण देणारं 'हे' ठेवलं नाव - मुस्लिम कुटुंबात आला राम
Published : Jan 23, 2024, 8:17 AM IST
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : अयोध्येत सोमवारी (22 जानेवारी) प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्याचं दरम्यान, अनेक मुस्लिम कुटुंबांनीही हा आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, फिरोजाबाद जिल्ह्यात एका मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म झाला. त्यावेळी एकीकडे रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. तर दुसरीकडं आपल्याला मुलगा झालाय या आनंदात या मुस्लिम दाम्पत्यानं आपल्या मुलाचं नाव राम-रहिम ठेवलय. त्यांनी या कृतीतून देशात धर्माच्या नावानं कितीही वातावरण दूषित झालं असल तरी सर्वांचा भगवान आणि अल्लाह राम-रहिम या नावातून एकच असल्याचा एक संदेश दिलाय. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. फरजान यांनी मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांच्या सासूबाई हुस्ना बानो यांनी सांगितले की, आज रामलल्लामुळे जीवन पवित्र झाले. आजच आमच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली याचा आम्हाला आनंद आहे. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही नवजात मुलाचं नाव राम-रहिम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.