महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मी चौथीत असताना बिड्या प्यायचो, विजय शिवतारे यांच्या खुलाश्याने खळबळ; पाहा व्हिडिओ - Vijay Shivtare - VIJAY SHIVTARE

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 9:52 PM IST

पुणे Vijay Shivtare : राज्यात सर्वत्र व्यसनमुक्तीचे धडे दिले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी एक कार्यक्रमात मी चौथीत असताना बिड्या प्यायचो असं वक्तव्य केलं आहे. सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हजेरी लावली. तेव्हा ते म्हणाले की, लहानपणी मी फार वांड होतो. चौथीत असताना जनावरे वळायला जायचो त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की चक्कर येऊन पडायचो असा खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे; पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे. विजय शिवतारे यांच्या या खुलाश्याने त्यांचे चाहतेही अवाक्‌ झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details