पोलिसांचा बंदोबस्त हटवला तर संजय राऊतांचा डाऊट दूर करू; संजय गायकवाड यांची शेलक्या शब्दात टीका - Sanjay Gaikwad On Sanjay Raut
Published : Aug 2, 2024, 3:47 PM IST
बुलडाणा Sanjay Gaikwad On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. संजय राऊतांच्या या टीकेला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे आम्हाला XXX फौजा घेऊन हरवणार का, असं म्हणाले. मात्र संजय राऊत यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला करुन भेटावं, त्यांचा डाऊट आम्ही दूर करू, असा जोरदार प्रहार आमदार संजय गायकवाड यांनी केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत हे विकास खरगे, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह कोणाकोणाचे पाय XXX होते, असा शेलका सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला. आम्ही स्वाभिमानानं बाजुला झालो असून आम्हाला XXX म्हणले जरा पोलिसांचा बंदोबस्त बाजुला करुन ये, तुझा डाऊट दूर होऊन जाईल, अशी शेलकी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.