महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"मांसाहारामध्ये प्रसादाचा भाव...", फडणवीसांच्या उपस्थितीत नेमकं काय म्हणाले पिठाधीश? पाहा व्हिडिओ - ABHINAV SHANKAR BHARTI MAHASWAMI

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 9:48 AM IST

नागपूर : "भारतीय परंपरेमध्ये उदात्तीकरण सर्व ठिकाणी दिसून येतंय. जर एखादं कुटुंब मांसाहार सेवन करत असेल तो त्यांच्यासाठी आवडीचा विषय असू शकतो. त्यात काही चूक नाही, खाल्लं पाहिजे. पण अनियंत्रितरुपानं दररोज मांसाहार केल्यानं त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसतात. ज्या प्राण्याचे मांस भक्षण केलं जातं, त्या प्राण्यातील भाव त्या व्यक्तीच्या शरीरावर काही अंशी दिसतात", असं मत कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पिठाधीश शंकराचार्य अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी व्यक्त केलंय. नागपूरमध्ये 'बनाये जीवन प्राणवान' या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. पुढं बोलत असताना पिठाधीश म्हणाले की, "आपल्या संस्कृतीमध्ये एकाद्या प्राण्याचा बळी दिली जातो. त्यानंतर मांस प्रसादरुपात भक्षण करतात. आधी मांस हा भोगाचा पदार्थ होता.  पण आता मांस हा प्रसाद झालाय. केवळ भोग पदार्थाला सोडून प्रसाद रुपात स्वीकार केल्यानं आहार पदार्थाचे गुण बदलतात असं संशोधन सांगतात."

ABOUT THE AUTHOR

...view details