प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, मानवी साखळीनं राबवली संविधान प्रतिकृती; पाहा व्हिडिओ - REPUBLIC DAY 2025
Published : Jan 26, 2025, 11:58 AM IST
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील सह्याद्री संस्थेच्या डी. के. मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'प्रजासत्ताक दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केलाय. महाराष्ट्र शासनानं 'घर घर संविधान' अभियान चालू केलंय. या पार्श्वभूमीवर संविधानाचं महत्त्व, त्यातील मूल्य आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसंच नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी 1332 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीनं संविधान प्रतिकृती तयार केली. तसंच 125 फुट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीमध्ये पाठमोरी प्रतिमा देखील काढण्यात आलीय. संविधानाच्या अध्ययनामुळं आणि चर्चेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकाराची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पालन करण्यासाठी प्रेरित करणं हीच यातून माफक अपेक्षा असल्याचं प्राचार्य साहेबराव कोल्हे यांनी सांगितलं.