'या' चुकांमुळे ब्रिटनमध्ये सत्तापालट; का झाला ऋषी सुनक यांचा पराभव? पाहा व्हिडिओ - Rishi Sunak
Published : Jul 6, 2024, 9:22 PM IST
पुणे Rishi Sunak : ब्रिटनमध्ये सत्तापालट झाला असून भारतीय वंशाचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत केयर स्टारमर यांच्या मजूर पक्षानं 412 जागा जिंकल्या आहेत. 2024 च्या या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय निश्चित मानला जात होता. जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून ब्रिटनला महत्त्वाचं स्थान आहे. त्याचवेळी हुजूर पक्षाचे नेतृत्व भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या रूपानं प्रथमच आल्यानं या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. सुनक कुटुंब भारतीय वंशाचे असल्यामुळं भारताकडं विशेष लक्ष वेधलं. कोविड काळात ते आरोग्य मंत्री होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतली. तेव्हा ऋषी सुनक यांना ब्रिटनमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांचा पराभव नेमका कशामुळं झाला याविषयी अभ्यासक दिगंबर दराडे यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहा हा संपूर्ण व्हिडिओ....