रश्मी शुक्ला साई चरणी लीन, मात्र महाराष्ट्रातील गुन्हेगारीसंदर्भातील प्रश्न विचारण्याची संधीच दिली नाही - Rashmi Shukla Shirdi Visit
Published : Feb 9, 2024, 10:10 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Rashmi Shukla Sai Darshan : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आज (9 फेब्रुवारी) शिर्डीत आल्या होत्या. (Rashmi Shukla Shirdi Visit) त्यांनी साईबाबा मंदिरात जाऊन साई समाधीचं दर्शन घेतलं. सोबतच त्यांनी साईबाबांच्या द्वारकामाईत तसंच गुरुस्थानाचंही दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके आणि मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी रश्मी शुक्ला यांचा साई मूर्ती आणि शाल देऊन सत्कार केलाय. (Police Officer Rashmi Shukla) साईबाबांच्या दर्शनानंतर "ई टीव्ही भारतशी" बोलताना त्या म्हणाल्या की, ''साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला आनंद झाला आहे. राज्यातील गुन्हेगारीसंदर्भातील प्रश्न विचारण्याचा प्रयत्न प्रतिनिधीनं केला. मात्र शुक्ला लगेच निघून गेल्या. यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि संस्थानचे प्रशासकीय अधिकारी विठ्ठल बर्गे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.