राहुल गांधींनी घेतली दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट - Rahul Gandhi - RAHUL GANDHI
Published : Sep 5, 2024, 3:25 PM IST
नांदेड Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण (MP Vasantrao Chavan) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वेडेट्टीवार देखील उपस्थित होते.
भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा नाही : अजूनही वसंतराव चव्हाण हे आपल्यातून निघून गेलेत यावर विश्वास बसत नाही. या भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. दुःखाच्या प्रसंगी राहुल गांधी वसंतराव चव्हाण यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी आले होते. काँग्रेस पक्षाची परंपरा आहे की, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना आधार देणं आणि वसंतराव चव्हाण हे असामान्य नेत होते. नांदेडमध्ये त्यांनी अविस्मरणीय असा विजय मिळवला. त्यामुळं अशा नेत्यांना विसरणं शक्य नाही, अशा शब्दात माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच लोकसभेमधील आपला सहकारी निघून जाणं हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणार नुकसान आहे. वसंतराव चव्हाण यांची कारकीर्द सदैव स्मरणीय राहील. राहुल गांधी यांच्या खांद्याला खांद्या लावून ते लोकसभेत कार्यरत झाले होते. पण दुर्दैवाने वसंतराव आपल्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री धीरज देशमुख यांनी दिली आहे.