निवारा वृद्धाश्रमातील 120 आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क! - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
Published : May 13, 2024, 1:36 PM IST
पुणे Lok Sabha Election 2024 : आज (13 मे) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुण्यासह जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, शिरुर, शिर्डी, बीड आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. पुण्यात आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात 16.16 टक्के मतदान झालं. दरम्यान, पुण्यातील नवी पेठ येथे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सखी बूथ तयार करण्यात आलंय. या बूथवर केवळ महिला अधिकारीच काम करत आहे. तसंच या मतदान केंद्रावर खास महिलांसाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं असून फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. या बूथवर आज नवी पेठ येथील निवारा वृध्दाश्रमातील 120 आजीबाईंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.