पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या - Pune Crime - PUNE CRIME
Published : Apr 5, 2024, 11:03 PM IST
पुणे Pune Crime News : पुण्यातील खडक पोलीस ठाण्याअंतर्गत लोहियानगर चौकीत पोलीस कर्मचाऱ्यानं रेस्टरूम मध्ये कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारत दत्ता आस्मर (वय 34) असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. भारत हे लोहियानगर पोलीस चौकीत रात्रपाळी कर्तव्यावर होते. पोलीस चौकीतील विश्रांती कक्षात शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आस्मर यांनी कार्बाइनमधून (ब.नं.10053) स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु या घटनेसंदर्भात तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली आहे.