VIDEO : यंदाही 'पुणेरी पलटण'च प्रो कबड्डी जिंकणार; आकाश शिंदेसोबत Exclusive बातचीत
Published : 5 hours ago
पुणे : प्रो कबड्डीच्या ११ व्या सिझनचे सामने मंगळवारपासून पुण्यात सुरू होत आहेत. त्यामुळं सर्वच संघाचे खेळाडू हे पुण्यात दाखल झाले आहेत. सध्या पॉईंट टेबलमध्ये हरियाणा स्टीलर हे प्रथम क्रमांकावर आहे, तर मागच्या वर्षी प्रो कबड्डीचा किताब जिंकणारी पुणेरी पलटण पाचव्या क्रमांकावर आहे. असं असताना यंदा देखील आम्हीच प्रो कबड्डीचा किताब जिंकणार असल्याचा विश्वास पुणेरी पलटण या संघाचा स्टार रेडर आकाश शिंदे याने व्यक्त केला. प्रो कबड्डीत ग्रामीण भागातील मुलांना मिळणारी संधी आणि या संधीचं खेळाडूंकडून सोनं होत असल्याचं देखील यावेळी आकाश शिंदे याने सांगितलं. यावेळी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी आकाश शिंदे याच्याशी खास बातचीत केली आहे. पाहा व्हिडिओ....