बोगस जात प्रमाणपत्रासंदर्भात आज निकाल, नवनीत राणांचं अंबादेवीला साकडं! - Lok Sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
Published : Apr 4, 2024, 10:36 AM IST
अमरावती Lok Sabha election : लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. त्यामुळं नवनीत राणा यांनी आज अंबादेवीला साकडं घातलंय. "जे सत्य आहे, ते जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महिलांच्या नशिबी संघर्ष आलाय. मी गेली 12-13 वर्षे माझ्या मतदारसंघात संघर्ष केलाय. मतदारसंघाच्या विकासासाठी मी सातत्यानं धडपडत आहे. संघर्ष आपल्या नशिबात असून कोणत्याही संघर्षाला मी तयार आहे," असं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं. "माझ्या मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत," असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला. नवनीत राणा आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील येणार आहे. त्यामुळं या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.