सिन्नर एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग; पाहा व्हिडिओ - एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
Published : Feb 2, 2024, 10:46 PM IST
नाशिक Nashik Fire News : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक भागातील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात आज (2 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे सिन्नर एमआयडीसी परिसर हादरला. या आगीमुळं कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवानं कारखान्यातील 20 हून अधिक कामगार सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. एकही जण या घटनेत जखमी झालेला नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीची माहिती कळताच सिन्नर नगर परिषद आणि एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशामक दलाच्या 10 गाड्याच्या मदतीने आग विझवण्यात आली. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.