पालखी सोहळ्यात सुनेत्रा पवारांनी खेळली फुगडी - Ashadhi Palkhi sohala - ASHADHI PALKHI SOHALA
Published : Jun 28, 2024, 6:12 PM IST
देहू Ashadhi Palkhi sohala : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आज तीर्थक्षेत्र देहूमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात फेरफटका मारून फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची वारी आनंदी-मंगलमय वातावरणात पार पडो, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडो, अशी प्रार्थना सुनेत्रा पवार यांनी तुकोबा महाराजांच्या चरणी केली. आमच्या काटेवाडीत वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतो, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. उल्लेखनिय बाब म्हणजे यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार आहेत.