महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

धक्कादायक! महापालिका अभियंत्याच्या टेबल ड्रॉवरमध्ये सापडलं नोटांचं बंडल; आप' कार्यकर्त्याने केला भांडाफोड - Pune Municipal Corporation

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 3:26 PM IST

पुणे : Bribery case in Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेतील एका अभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये नोटांचं बंडल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पथविभागात काल मंगळवार दुपारी हा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलेला आहे. आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. रविकांत काळे हे एका कामासाठी महापालिकेत गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती उपभियांत्याच्या ड्रॉवरमध्ये संशयास्पद काहीतरी ठेवून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी ड्रॉवर उघडला असता त्यात पाचशेच्या नोटांचा गठ्ठा आढळून आला. याबाबत विचारणा केली असता एक ठेकेदार ही रक्कम ठेवून गेला असल्याचं उप अभियंत्यानं सांगितलं. तुम्ही हे पैसे का ठेवून घेतले याचं समाधानकारक उत्तर त्याला देता आलं नाही. त्यामुळे काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर रविकांत काळे हे याबाबत तक्रार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जात असतानाच संबंधित उप अभियंता रोख रकमेसह गायब झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details