महाराष्ट्र

maharashtra

देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण: ही तर आमच्यासाठी आनंदाची बाब, 'या' मंत्र्यांनी व्यक्त केलं मत - Chandrakant Patil Statement

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 2:35 PM IST

संपादित छायाचित्र (ETV Bharat)

पुणे Chandrakant Patil On Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्हाला आनंदच आहे. शेवटी माणसानं एक एक पायरी वर चढली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण आहेत. केंद्रीय नेतृत्वानं असा जर विचार केला असेल, तर ती आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असं यावेळी पाटील म्हणाले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील सारसबाग इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.  

ABOUT THE AUTHOR

...view details