मनमोहन सिंग श्रद्धांजली : राजकारणात इतका सभ्य आणि हुशार माणूस पुन्हा होणे नाही - सूर्यकांता पाटील - MANMOHAN SINGH
Published : Dec 27, 2024, 5:49 PM IST
|Updated : Dec 27, 2024, 6:54 PM IST
नांदेड : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन माझ्यासाठी दुःखद घटना आहे. सध्याच्या राजकारणात असा सभ्य आणि हुशार माणूस होणे नाही अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिली. ते पंतप्रधान असताना सूर्यकांता पाटील यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून पाच वर्षे त्यांच्यासोबत काम केलं. त्यापूर्वी देखील सूर्यकांता पाटील संसदेत त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी दुख व्यक्त केलं. शिवाय त्यावेळेच्या आठवणींना सूर्यकांता पाटील यांनी उजाळा दिला. देशाला वाचवणारे, देशाला सुरक्षित ठेवणारे मनमोहन सिंग आणि नृहसिंह राव होते. ते अर्थमंत्री नसते तर आपला इथिओपिया झाला असता. देश भिकेला लागला असता, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या. त्यांच्याकडे मारुती 800 गाडी होती. त्या गाडीवर त्यांचं खूप प्रेम होतं. पंतप्रधान असताना देखील त्यांची मारुती 800 गाडी संसदेत असायची. सर्व सरकारी गाड्यांसोबत ती गाडी देखील असायची. ते नेहमी त्या गाडीकडे बघायचे. त्या गाडीत येताना मी त्यांना कधी बघितलं नाही. पण गाडीवर त्यांचं विशेष प्रेम होतं ही एक आठवण सूर्यकांता पाटील यांनी सांगितली.