"महागाईनं जनता त्रस्त, महायुती सरकार वसुलीत व्यस्त", विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी - maharashtra monsoon session 2024
Published : Jul 5, 2024, 12:51 PM IST
मुंबई Maharashtra Monsoon Session 2024 : राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आजचा (5 जुलै) आठवा दिवस आहे. नेहमीप्रमाणे आजही विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा आज तीन दिवसाच्या निलंबनानंतर विधानभवनात दाखल झालेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, भाई जगताप यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी 'महागाईनं जनता त्रस्त, महायुती सरकार वसुलीत व्यस्त', 'सरकारने लुटली सरकारी तिजोरी, जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी', 'भाजी महागली कडधान्य महागले, महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले', 'सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई', अशा आशयाचे बॅनर्स विरोधकांच्या हातात घेऊन घोषणाबाजी केली.