ETV Bharat / state

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू - BEED ACCIDENT

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं उडवल्याची घटना घडलीय. या घटनेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय.

Beed Accident, speeding ST bus crushed 3 youth who preparing for police recruitment
भरधाव एसटी बसनं तिघांना उडवलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2025, 10:13 AM IST

Updated : Jan 19, 2025, 12:30 PM IST

बीड : बीड तालुक्यातील (Beed Accident) घोडका राजुरी जवळ भरधाव एसटी बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 जणांना उडवल्याची घटना घडलीय. या घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आज (19 जाने.) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

तिघांचा जागीच मृत्यू : बीडवरुन परभणीकडं प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस क्रमांक MH-14 BT 1403 या बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांना उडवलं. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्यानं ते बचावले. मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (speeding ST bus crushed 3 youth) झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तिन्ही मृत तरुणांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आलंय. सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय 20), विराट बब्रूवान घोडके (वय 19) आणि ओम सुग्रीव घोडके (वय 20) अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर इतर दोघांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाचा घेतला जीव : काही दिवसांपूर्वी परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीला धडक दिल्यानं सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीवरून रात्री साडेआठ वाजता काम आटपून दुचाकीनं गावाकडं निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परनं धडक दिली. यावेळी अभिमन्यू क्षीरसागर हे जोराच्या धडकेनं रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातांच्या प्रमाणात वाढ : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळं अपघाताची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. एकीकडं पोलीस प्रशासन विभागाच्या वतीनं रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये वाहन चालकांनी वाहनांवर नियंत्रण ठेवावं, यासाठी त्यांना सूचना दिल्या जातात. पण, वाहन चालक वाहन चालवताना नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यामुळं अपघात होत असल्याचं बघायला मिळतंय.

हेही वाचा -

  1. धावत्या दुचाकीवर रिल काढणं पडलं महागात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी - Beed Accident
  2. अहमदनगर-अहमदपूर रोडवर कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात; 5 ठार
  3. Beed News : बीडमध्ये दोन अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

Last Updated : Jan 19, 2025, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.