"मला 51 टक्क्याची लढाई लढायची", सिद्धार्थ शिरोळेंचं नेमकं गणित काय? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Nov 11, 2024, 10:11 PM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता प्रचाराला देखील जोर धरू लागलाय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेस पक्षाचे दत्ता बहिरट यांच्यात लढत होताना पाहायला मिळत आहे. आत्ता या मतदारसंघात देखील दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अश्यातच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी 5 वर्षात केलेल्या कामांबाबत माहिती देत, मला मतदारसंघातील 51 टक्के मतदारांपर्यंत पोहचायचं असून कोणी कितीही काही टीका केली, तरी आमचं टार्गेट 51 टक्के असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांच्या टीकेवर देखील उत्तर देताना शिरोळे यांनी विरोधक 5 वर्ष कुठं होते, मला ते दिसले नसल्याचं सांगितलं. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी शिवाजी नगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी ते बोलत होते.