महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हडपसरमधून उमेदवारी मिळावी, यासाठी हजारो शिवसैनिकांच्या वतीनं महाआरती; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : 9 hours ago

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. पहिल्या यादीत पुण्यातील 3 मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाली असून पुणे शहरातील हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये अजूनही तिढा कायम आहे. ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार? की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार? हे अजूनही स्पष्ठ झालेलं नाही. अश्यातच आज शिवसेना पक्षाकडून शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना हडपसर मतदार संघातून उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसैनिकांनी प्रभू श्री रामाची महाआरती आयोजित करण्यात आली होती. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना विधानसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी हजारो शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी हडपसर येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूर्णाकृती शिल्पाला साकडं घालून प्रभू श्रीरामांची महाआरती केली.

ABOUT THE AUTHOR

...view details