पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून इच्छुकांची गर्दी; माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले... - मुरलीधर मोहोळ
Published : Mar 2, 2024, 8:26 PM IST
पुणे Pune Loksabha Constituency : देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार असून यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. पुणे लोकसभा मतदार संघासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपा तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस अशी लढत होणार आहे. असं असतानाच भाजपाकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुकांनी गर्दी केल्याचं बघायला मिळतंय. पुणे मतदारसंघासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर तसंच शिवाजी मानकर हे इच्छुक असून प्रत्येकजण आपापल्या परीनं तयारीला लागलंय. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पक्ष जो उमेदवार निवडेल त्याला आम्ही सर्वजण सहकार्य करू. तसंच पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून बघण्यासाठी पुण्यात भाजपाचा उमेदवार जिंकूनच आणू", असंही ते म्हणाले.