महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोयता गँगची दहशत : वाईन शॉपच्या मालकावर केला हल्ला; संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद - attack on wine shop owner

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 8:53 PM IST

पिंपरी चिंचवड ( पुणे)  Koyta Gang Attack : पुणे शहरानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. वाईन शॉपवर झालेल्या किरकोळ वादातून दुकान मालकावर एकानं धारदार कोयत्यानं सपासप वार केले आहे. तसंच त्याच्यावर दगडानंदेखील हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत वाईन शॉपचा मालक गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहे. ही घटना आज (4 फेब्रुवारी) दुपारी घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चिंचवड परिसरामध्ये असलेल्या  वाईन्स शॉपी या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील कैद झाली आहेत. वाईन शॉपमध्ये बील घेण्याच्या वादातून स्थानिक गावगुंड आणि वाईन शॉप मालक यांच्यामध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर ही घटना घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details