चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मला तुरुंगात टाकणार; मी बॅग भरून ठेवली आहे, आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane On MVA - NITESH RANE ON MVA
Published : Aug 30, 2024, 11:39 AM IST
सांगली Nitesh Rane On MVA : राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकर यांना तुरुंगात जावं लागणार, असं भाकीत भाजपा आमदार नितेश राणेंनी केलं आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांसह आपण दोघंही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोट्या खेळत असू, असं त्यांनी यावेळी सांगतलं. मला तर पहिल्या 100 दिवसाच्या आत टाकतील, मला ते माहीत असल्यानं मी बॅग भरून ठेवली आहे, असंही नितेश राणेंनी स्पष्ट केल आहे. ते सांगलीच्या विटा इथं बोलत होते. संजय राऊतांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लोहे को लोहा काटताय, ही शकल लढवून आपल्याला पुढं केलं आणि तू पण बोलत बस, काय बोलायचं ते बोल, म्हणून आपण रोज सकाळी सुरू करतो. तो चायनीज मॉडेल शिवसैनिक आहे, आपण ओरिजनल शिवसैनिक आहोत, अश्या शब्दात नितेश राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.