मला इंग्रजी बोलता येत नाही, रवींद्र धंगेकर यांच्या साधेपणाला शशी थरूर यांची साद..म्हणाले - Shashi Tharoor Election Campaign - SHASHI THAROOR ELECTION CAMPAIGN
Published : May 5, 2024, 11:02 PM IST
पुणे Shashi Tharoor Election Campaign : पुणे लोकसभा निवडणुकीत आता प्रचाराला जोर धरू लागला असून भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून अनेक नेते मंडळी पुण्यात येऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहे. अशातच पुण्यात आज (5 मे) काँग्रेस नेते शशी थरूर यांचा युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुणांच्या प्रश्नांना शशी थरूर यांनी अगदी अभ्यासपूर्ण उत्तर देत होते. दरम्यान पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन: यावेळी झालेल्या भाषणात धंगेकर म्हणाले की, या कार्यक्रमाला मी आलोय. कारण शशी थरूर साहेब याठिकाणी आले आहेत. पण माझी पदयात्रा असल्यामुळे मला लवकर जावं लागतंय. मला इंग्रजी बोलता येत नाही असं सहजपणे धंगेकर यांनी मान्य केलं. यालाच उत्तर देताना शशी थरूर यांनी ज्यांचे मन साफ असेल त्याला कुठल्याच भाषेमध्ये अडचण घालू शकत नाही असं उत्तर दिलं आणि सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. यालाच उत्तर देत थरूर यांनी मी तुम्हाला समर्थन देण्यासाठी आलो असून लोकांना आवाहन आहे की, काँगेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असं यावेळी थरूर म्हणाले.