महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण साजरा; पाहा व्हिडिओ - Holi Celebration In Nashik - HOLI CELEBRATION IN NASHIK

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 10:46 PM IST

नाशिक Nashik Holi Celebration :  फाल्गुन महिन्याच्या हुताशनी पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. प्रांतानुसार या सणाच्या पद्धती बदलत असल्या तरी अपवित्र, अमंगल प्रवृत्तींचा नायनाट करण्याच्या उद्देशानं या सणाचं माहात्म्य मोठं आहे. नाशिकमध्ये आज (24 मार्च) पारंपारिक पद्धतीनं होळीचा सण साजरा करण्यात आला. दृष्ट प्रवृत्ती, अमंगल विचारांचा नाश करून, चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी करण्यासाठी होळीचा सण साजरा केला जातो. यंदा होळीच्या दिवशी रविवार असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून आलं नाशिक शहरात ठिकठिकाणी गवऱ्या रचून होळी प्रज्वलित करण्यात आली. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मखमलाबाद नाका भागात कैलास मित्र मंडळाच्या वतीनं चार हजार गौऱ्या रचून त्यावर होलीका मातेची प्रतिमा ठेवून पूजा,आरती करण्यात आली. यानंतर सुहासिनींनी गौरीचं पूजन केलं आणि त्यानंतर होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details