महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

DCAD Picture Exhibition : कोकणच्या रम्य भूमित कलाशिक्षण घेणाऱ्या कलाकारांचे पुण्यात प्रदर्शन; प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - DCAD Picture Exhibition

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 8:24 PM IST

Updated : Mar 14, 2024, 12:22 PM IST

पुणे DCAD Picture Exhibition : पुणे शहराला शैक्षणिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी देखील म्हटलं जातं. पुणे शहरात अनेक सांस्कृतीक कार्यक्रम तसंच विविध कलागुणांचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. अश्यातच पुणे शहरातील घोले रोडवरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी (Raja Ravi Varma Arts Gallery) येथे, देवरूख कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझाईनच्या (Devrukh College of Art and Design) वतीनं पाच दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात महाविद्यालयातील शिक्षक तसंच विद्यार्थी यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे. एकूण 32 कलाकारांनी काढलेली विविध कलात्मक चित्रे आणि म्युरल कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनातील १५ कलाकृती विकल्या गेल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे, विभागप्रमुख प्रा. विक्रम परांजपे, प्रा. अवधूत पोटफोडे, प्रा. स्वप्निल बडबे तसंच प्रा. सुयोग पेंढारकर आणि प्रा. दिशांत सुटे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. पित्रे फाउंडेशन पुरस्कृत क्रेडारच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींसह पाहूयात या प्रदर्शनासंदर्भात डीकॅडचे प्राध्यापक सुयोग पेंढारकर यांनी दिलेली माहिती.

Last Updated : Mar 14, 2024, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details