महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडिओ - EKNATH SHINDE ON SHARAD PAWAR

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

ठाणे : आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एकीकडं महायुतीतील भाजपाकडून शरद पवार यांचा हीन शब्दात उल्लेख करून वारंवार अपमान केला जात आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वपक्षातील नेत्यांना कानपिचक्या देत, शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान करण्याची तंबी दिली. तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांनी मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं. आपल्या शुभेच्छा संदेशात एकनाथ शिंदे म्हणतात, "महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शरद पवार यांना मी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो" अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांबाबत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details