आरक्षणाची मागणी कायद्याला धरूनच, मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार - मनोज जरांगे पाटील - मराठा आरक्षण
Published : Jan 24, 2024, 9:29 PM IST
पुणे Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला मोर्चा आज (24 जानेवारी) पुण्यातून मुंबईच्या दिशेनं निघाला. मराठा समाजाच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनाला सर्वच समाजाचा पाठिंबा मिळत आहे. कारण आरक्षणाची मागणी ही कायद्याला धरून आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठीच मुंबईला जात आहे आणि आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा खराडी येथून निघून लोणावळा येथे मुक्काम करणार आहे. खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथून या मोर्चाला सुरुवात झालीे. यावेळी जरांगे पाटील यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी. त्यांनी यावेळी त्यांची भूमिका काय मांडली ते पाहूयात.