संजय राऊत नारदमुनी, आदित्य ठाकरेंना मुंगेरीलालचे स्वप्न पडतात, दादा भुसेंची ठाकरेंसह राऊतांवर जोरदार टीका - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
Published : Apr 21, 2024, 11:04 PM IST
अहमदनगर (शिर्डी) Dada Bhuse : संजय राऊत हे नारदमुनीची भूमिका नेहमी निभावतात. त्यांनी आता पर्यंत कुटील स्वप्ने दाखवायचे, दिशाभूल करायची हेच काम केलेले आहे. रोज सकाळी त्यांचा भोंगा वाजत असतो. शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न होतं; मात्र ते होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना संधी द्यावी या वक्तव्यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरेंना मुंगेरीलाल के हसीन सपने : ठाकरे त्या कोषातून बाहेर पडत नाही. गर्दी दिसली का त्यांना वाटते गर्दी आमच्या मुळेच झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघात आपली किती ताकत आहे ते पहावे, अशी जोरदार टीका मंत्री दादा भुसे यांनी केलीय. आदित्य ठाकरे यांनी काल शिर्डीत महाराष्ट्रात फक्त ठाकरे पॅटर्न असल्याचं वक्तव्य केलं होतं. ठाकरेंच्या व्यक्तव्यावर दादा भुसेंनी आज शिर्डीतील पत्रकार परिषदेत टीका केलीय. मुंबईतून मिलिंद नार्वेकर यांना भाजपाकडून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना दादा भुसे यांनी तो वरिष्ठांचा निर्णय असेल. मला त्याबाबत माहिती नाही. मिलिंद नार्वेकर माझेही मित्र आहेत. ते आले तर त्यांचं स्वागत करणार का? यावर नक्कीच त्यांचं स्वागत करेल असं दादा भुसे यांनी म्हटलयं.
भुजबळ नाराज नाहीत : नाशिकमध्ये भुजबळ यांची नाराजी नाही. आम्ही सर्व एकत्रित काम करत आहोत. नाशिक, ठाणे या शिवसेनेच्या जागा आहेत. उमेदवारी घोषित व्हायला उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. मात्र, परत मोदींना पंतप्रधान करण्याचं जनतेनी ठरवलं आहे, असं दादा भुसे म्हणाले.