सतेज पाटलांना धक्का; काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Published : 4 hours ago
ठाणे : काँग्रेस मधील नाराजीमुळं कोल्हापूर उत्तर मधल्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. लागलीच त्यांना उपनेतेपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. जयश्री जाधव यांनी 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसनं यावेळी उमेदवारी न दिल्यानं त्या नाराज होत्या. त्यामुळं त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळं शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मदत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला मिसळ खाण्याचा आनंद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र दरवर्षीप्रमाणे मिसळ खाण्याचा आनंद देखील घेतला. दरवर्षी नौपाडा परिसरातील एका ठिकाणची मिसळ मुख्यमंत्र्यांना फार आवडते. निवडणुकीच्या तोंडावर थोडासा स्वतःसाठी वेळ काढत त्यांनी खासदार सुखान शिंदे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत मिसळ खाण्याचा आनंद देखील घेतला.