मुनाव्वर फारुकीचे सेलिब्रेशन टिपण्यासाठी ड्रोनचा बेकायदेशीरपणे वापर; पोलिसांकडून ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल - Illegal use of drones
Published : Jan 31, 2024, 7:55 PM IST
मुंबई Munawwar Farooqui celebrations : बिग बॉस जिंकल्यानंतर मुनाव्वर फारुकी मुंबईच्या डोंगरी भागात पोहोचला. लोक त्याच्या स्वागतासाठी आले. (Illegal use of drones) यावेळी सेलिब्रेशन टिपण्यासाठी ड्रोनचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला. यावरून पोलिसांनी ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल केला. 'बिग बॉस 17' जिंकल्यानंतर मुनाव्वर फारुकी त्याच्या घरी पोहोचला. त्याचे घर मुंबईच्या डोंगरीमध्ये आहे. त्यांच्या स्वागतासाठी हजारोंचा जनसमुदाय त्या परिसरात जमला होता. हा अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील डोंगरी पोलिसांनी ड्रोन ऑपरेटरविरुद्ध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
परवानगी न घेता ड्रोनद्वारे व्हिडीओग्राफी : बिग बॉस 17 जिंकल्यानंतर, मुनाव्वर फारुकी मुंबईच्या डोंगरी येथे गेला. तेथे चाहत्यांच्या गर्दीनं त्याचं स्वागत केलं. फारुकी कारच्या सनरूफवर उभा राहून ट्रॉफी उचलताना दिसत आहे. (case filed against drone operator ) त्यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस हवालदारानं पाहिलं की, ड्रोन उडवले जात होते. एका व्यक्तीला ड्रोन कॅमेरा वापरून सेलिब्रेशन टिपताना पाहून पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाले. ड्रोन ऑपरेटरचे नाव अरबाज युसूफ खान (२६) असे आहे. त्याची चौकशी केली असता आणि त्याला परवानगी मागितली असता त्याने नकार दिला. त्याच्याकडे काहीही नव्हते. पोलिसांनी खानचे ड्रोन जप्त केले आहे.