महाराष्ट्र

maharashtra

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर येथील डॉक्टरांचा कँडल मार्च - Kolkata doctor Rape Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 11:03 PM IST

अहमदनगर येथील डॉक्टरांचा कँडल मार्च (ETV Bharat Reporter)

कोलकाता : 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील एका मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनीची बलात्कार आणि निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरातील सर्व डॉक्टर संघटनांनी रुग्णालय बंद ठेवण्याची घोषणा केली. यासोबतच भारतीय वैद्यकीय संघटना आणि सर्व वैद्यकीय शाखा तसंच केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. अहमदनगरमध्येही डाक्टरांनी कॅण्डल मार्च काढत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढत कार्यालयासमोर कँडल रस्त्यावर ठेऊन वी वान्ट जस्टीस घोषणा देण्यात आल्या. "17 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून ते 18 तारखेच्या सकाळी 6 वाजेपर्यंत काम बंद आंदोलन पुकारलं आहे. इमर्जन्सी वगळता कुठलीही सेवा देणार नसल्याचं डॉक्टर सी. डी. मिश्रा यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details