महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

येणाऱ्या वर्षात वित्तीय तूट कमी केली जाणार ही चांगली बाब - प्रशांत गिरबने - Budget 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 5:30 PM IST

पुणे Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (Prashant Girbane) महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा तसंच पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरं महिलांना देण्यात येणार आहेत, अशी घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली. आजच्या बजेटवर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं आजचं बजेट हे अंतरिम बजेट होतं.

खर्चात 6 टक्क्यांनी वाढ : केंद्र शासनाचं मागील वर्षीचं बजेट 45 लाख कोटींचं होतं, तर पुढील वर्षीचं बजेट हा 47.6 लाख कोटींचं असणार आहे. म्हणजेच यात आपल्या खर्चात 6 टक्के वाढ होणार आहे आणि हा पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. तो खर्च 11 लाख कोटी इतका असणार आहे आणि पायाभूत सुविधांवर 11 टक्के खर्च होणार आहे, ही चांगली बाब आहे. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तसंच वित्तीय तूटही कमी केली जाणार आहे ही देखील चांगली बाब असल्याचं यावेळी गिरबने म्हणाले. एकूणच आजच्या बजेटवर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details