महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महाराष्ट्रासह देशात यूपीएससीचे 22 बोगस अधिकारी? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा - UPSC Bogus officeres - UPSC BOGUS OFFICERES

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 10:34 PM IST

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह देशातील एकूण 22 यूपीएससीचे आधिकारी बोगस असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. एवढंच नाही तर या 22 अधिकाऱ्यांची नावं असणारी एक डॉक्युमेंट 'यूपीएससी फाईल' नावानं सोशल मीडियावर फिरत आहे.  ती यादी देखील विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. यात पुणे शहरातील एक तर राज्यातील चार अधिकारी आहेत. ते सध्या देशातील विविध राज्यात सेवा देत आहे. "याबाबत मी यूपीएससी आयोगाला पत्र लिहून या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे," असं विजय कुंभार यांनी सांगितलं. "यूपीएससीने त्यांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी," अशी मागणी देखील यावेळी कुंभार यांनी केली आहे.

Disclaimer- ईटीव्ही भारत सोशल मीडियात फिरत असलेल्या कथित व्हायरल व्हिडिओबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. 

ABOUT THE AUTHOR

...view details